आज तुमच्यासाठी कृपा
१८ मार्च २०२६
✨ तुमच्यातील ख्रिस्त म्हणजे तुम्हीच नवीन!
“मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलो आहे; आता मी जगत नाही, तर ख्रिस्त माझ्यात जगतो.”
गलतीकरांस पत्र २:२० (NKJV)
प्रियजनांनो,
सुवार्तेतील सर्वात गहन रहस्यांपैकी एक हे आहे: ख्रिस्त आता तुमच्यामध्ये राहतो.
ख्रिस्ती जीवन म्हणजे देवाला अधिक संतुष्ट करण्याचा प्रयत्न करणे नव्हे. ते म्हणजे तुमच्यातील ख्रिस्ताच्या जीवनाला तुमच्याद्वारे व्यक्त होऊ देणे होय.
जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारले, तेव्हा तुम्हाला केवळ एक नवीन ओळखच मिळाली नाही तर याहूनही अधिक म्हणजे- तुम्हाला त्याच्याशी एकरूप केले गेले. तुम्ही आणि ख्रिस्त एकमेकांत गुंतलेले आणि अविभाज्य आहात. स्वतःला पाहणे म्हणजे ख्रिस्ताला पाहणे! व्वा! अद्भुत!!
✨त्याचे जीवन तुमचे जीवन झाले.
✨त्याचे नीतिमत्व तुमचे नीतिमत्व झाले.
✨त्याचा विजय तुमचा विजय झाला.
याचा अर्थ असा की, ख्रिस्ती जीवन हे स्वप्रयत्नाचे जीवन नाही, तर विश्वासणाऱ्याद्वारे व्यक्त होणारे ख्रिस्ताचे जीवन आहे.
तुम्ही नवे म्हणून एका सामर्थ्यशाली सत्यावर जगता:
✨ तुमच्यामध्ये ख्रिस्त — गौरवाची आशा.
ही आशा म्हणजे, आपल्यामध्ये ख्रिस्त राहत असल्याची जाणीव अधिक होणे, आणि त्याचे चारित्र्य व सामर्थ्य आपल्या जीवनात जितके अधिक दृश्यमान होईल तितके अधिक जागरूक होणे.
✨ प्रार्थना
माझ्या पिता परमेश्वरा!, ख्रिस्त माझ्यात राहतो यासाठी तुझे आभार. तुझा पवित्र आत्मा मला दररोज ख्रिस्तासोबतच्या या ऐक्याची वाढती जाणीव करून देवो. त्याचे जीवन माझ्याद्वारे प्रकट होऊ दे. येशूच्या नावाने, आमेन.
✨ कबूलनामा
ख्रिस्त माझ्यात राहतो. मी आणि ख्रिस्त एक आहोत – एकमेकांत गुंतलेले. पवित्र आत्मा मला ख्रिस्ताच्या प्रगतीशील प्रकटीकरणात आणतो, जोपर्यंत मी ख्रिस्ताची हुबेहूब प्रतिमा बनत नाही. 🙏
पुनरुत्थित येशूची स्तुती असो
ग्रेस रिव्होल्यूशन गॉस्पेल चर्च
