आज तुमच्यासाठी कृपा
२३ मार्च २०२६
✨ तुमच्या नव्या स्वरूपाचे प्रकटीकरण अपराधबोध आणि भीतीपासूनच्या स्वातंत्र्याने सुरू होते
“म्हणून जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत, त्यांना आता दोषारोप नाही.” रोमकरांस पत्र ८:१ (NKJV)
प्रियजनांनो, आपण या नवीन आठवड्यात प्रवेश करत असताना, पवित्र आत्मा आपल्याला एका विजयी जीवनशैलीकडे नेत आहे—जी देवाशी जवळीक आणि प्रार्थनेला मिळालेल्या उत्तरावरील विश्वासाने ओळखली जाते.
या संपूर्ण महिन्यात, पवित्र आत्मा आपल्याला “तुमच्या नव्या स्वरूपाविषयी” शिकवत आहे. या आठवड्यात, आपल्याला त्या नवीन ओळखीच्या प्रकटीकरणासाठी मार्गदर्शन केले जात आहे.
तुमच्या नव्या स्वरूपाचे पहिले प्रकटीकरण
तुम्ही दोषारोप आणि भीतीपासून मुक्त जीवन जगता.
विश्वासणाऱ्यांसाठी:
तुमचे भूतकाळातील जीवन—त्यातील कृती किंवा विचार—स्वर्गाच्या न्यायमंदिरात तुमच्याविरुद्ध आरोप म्हणून टिकू शकत नाहीत.
ख्रिस्तामध्ये, तुमचा खटला संपला आहे.
देवाने तुम्हाला आधीच नीतिमान ठरवले आहे. तुमची पुन्हा चौकशी होणार नाही, तुमचा भूतकाळ पुन्हा उघडला जाणार नाही.
तरीही अनेक विश्वासणारे अजूनही असे जगतात जणू काही त्यांच्यावर खटला चालू आहे—अपराधबोध, भीती आणि आत्म-निंदेच्या ओझ्याखाली दबलेले. हे निंदा अस्तित्वात असल्यामुळे नाही, तर देवाचे नीतिमत्व आणि एक नवीन निर्मिती – नवीन मी म्हणून आपल्या ओळखी बद्दलच्या समजुतीच्या अभावामुळे आहे.
ख्रिस्तामधील तुमची ओळख – तुम्ही एक नवीन निर्मिती आहात.
तुम्ही ख्रिस्तामध्ये देवाचे नीतिमत्व आहात.
देव तुमचे जुने जीवन पाहत नाही.
देव तुमची भूतकाळातील पापे लक्षात ठेवत नाही.
तुम्हाला पूर्णपणे क्षमा केली आहे, पूर्णपणे स्वीकारले आहे आणि सार्वकालिकरित्या नीतिमान ठरवले आहे.
तुमच्या कृतींमुळे देवाचा निर्णय बदलत नाही. स्वर्गीय न्यायाधीशाने घोषित केले आहे: “तुम्ही नीतिमान ठरला आहात. खटला कायमचा रद्द झाला.”
👉 कोणतीही निंदा नाही.
आज, दोषारोप करणाऱ्या प्रत्येक आवाजाला नकार द्या.
प्रार्थना
पिता परमेश्वर, ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कार्याबद्दल मी तुझे आभार मानतो.मी तुझ्या वचनातील सत्य स्वीकारतो की, तुझ्यामध्ये मी नीतिमान ठरलो आहे, मला क्षमा मिळाली आहे आणि मला स्वीकारले गेले आहे. येशूच्या नावाने! आमेन.
विश्वासाची कबुली
मी ख्रिस्तामध्ये एक नवीन निर्मिती आहे.माझ्या जीवनात कोणताही दोषारोप नाही.मी ख्रिस्त येशूमध्ये देवाचे नीतिमत्व आहे.
मी अपराध, भीती आणि आत्म-दोषारोप यांचा त्याग करतो.माझा भूतकाळ पुसून गेला आहे, माझा वर्तमानकाळ सुरक्षित आहे आणि माझे भविष्यकाळ गौरवशाली आहे. मी आता आणि सदासर्वकाळ स्वतंत्र, स्वीकारलेला आणि नीतिमान म्हणून जगतो.
मी ख्रिस्त येशूमध्ये माझ्या नवीन ओळखीच्या स्वातंत्र्यात धैर्याने चालतो. आमेन.
पुनरुत्थित येशूची स्तुती करा
ग्रेस रिव्होल्यूशन गॉस्पेल चर्च
